Breaking News
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू शंतनू मोरे, कप्तान प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक, मनोज कांबळे यांच्या दमदार खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य केईएम हॉस्पिटलचे आव्हान ८ विकेटने संपुष्टात आणले आणि उपांत्य फेरीत धडक दिली. अष्टपैलू गौरव बरोडिया, विनायक कोकणे, जयदीप मेहेर, डॉ. बालाजी बास्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही केईएम हॉस्पीटलला पराभवास सामोरे जावे लागले. नाबाद अर्धशतकवीर शंतनू मोरेने सामनावीर व गौरव बरोडियाने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार माहीम ज्युवेनाईलचे सेक्रेटरी सुनील पाटील, को-ऑप. बँक युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे व जनार्दन मोरे, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया सहकार्यीत शिवाजी पार्क येथील स्पर्धेमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या केईएम हॉस्पिटलची फलंदाजी डावाच्या मध्यापर्यंत बहरली नाही. मध्यमगती गोलंदाज शंतनू मोरे (१७ धावांत ३ बळी) व फिरकी गोलंदाज प्रदीप क्षीरसागर (२४ धावांत १ बळी) यांची विकेट घेणारी गोलंदाजी त्यास कारणीभूत ठरली. तरीही गौरव बरोडिया (३० चेंडूत ३३ धावा), विनायक कोकणे (१८ चेंडूत २६ धावा), जयदीप मेहेर (१७ चेंडूत नाबाद २० धावा), डॉ. बालाजी बास्ते (१७ चेंडूत १४ धावा) यांच्या फलंदाजीमुळे केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १२२ धावांपर्यंत मजल गाठली. आघाडीचे फलंदाज शंतनू मोरे (४३ चेंडूत नाबाद ५४ धावा), रोहन महाडिक (२९ चेंडूत ३३ धावा) व मनोज कांबळे (१७ चेंडूत नाबाद २१ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १७.४ षटकात २ बाद १२३ धावा फटकावून उपांत्यपूर्व फेरीतील विजयावर शिक्कामोर्तब केला.
******************************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant