Breaking News
प्रियांका गांधी यांनी भारतीय संविधान हाती घेऊन घेतली शपथ
नवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : लोकसभेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सध्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दोन दिवस स्थगित झालेल्या संसदेचे कार्य सुरु झाले असून शपथविधी सोहळा सुरु झाला आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांनी यांनी माय मराठीमध्ये शपथ घेतली आहे.
लोकसभेमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी व काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांचे लोकसभेचे स्पीकर ओम बिरला यांनी त्यांचे नाव घेताच ते शपथविधीसाठी पुढे आले. रवींद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांची ही शपथ लक्षवेधी ठरली. रवींद्र चव्हाण यांनी मराठीमध्ये शपथ घेतली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार वसंत चव्हाण यांनी विजय मिळवला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला होता. भाजप उमेदवाराला टक्कर देत वसंतराव चव्हाण यांनी विजय खेचून आणला होता. मात्र त्यांचे २६ ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.
निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपने डॉ. संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली होती. रवींद्र चव्हाण यांनी १४५७ मतांनी विजय मिळवला. आज (२८ नोव्हेंबर) त्यांचा लोकसभेमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनी देखील संसदेमध्ये शपथविधीवेळी संविधानाची प्रत दाखवली.
लोकसभा भवनात वायनाडच्या खासदार म्हणून प्रियांका गांधी यांनी शपथ घेतली. पहिल्यांदाच त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. राहुल गांधी यांच्याप्रमाणे प्रियांका गांधी यांनी देखील संविधान हाती घेत शपथ ग्रहण केली. सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी कामकाज पाहत आहेत. तर आता प्रियांका गांधी या देखील खासदार म्हणून कार्यरत होणार आहेत. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. वायनाडमध्ये, राहुल गांधींनी सोडलेल्या जागेवरील वायनाड पोटनिवडणूक प्रियांका गांधी यांनी विराट विजय मिळवला. प्रियांका गांधी या ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकल्या आहे. त्यांनी सीपीआई सत्यन मोकेरी यांचा ४ लाख १० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर