Breaking News
शिवसेना नेमकी कोणाची याचे उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहे….
सातारा - दि ५– शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देऊन धनुष्यबाण गहाण टाकणाऱ्याना आम्ही बाजूला केले आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची ते दाखवून दिले आहे असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती अशी टीका काल राज यांनी केली होती.
सरकार जनतेशी संवाद साधणारे आणि नागरिकांचे ऐकणारे असावे लागते मात्र, यापूर्वीचे सरकार बहिरे होते, अशी टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा इथल्या सभेत केली. पाटण विधानसभा मतदारसंघाचे, शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी, साताऱ्यात आयोजित प्रचारसभेत, ते बोलत होते. अडीच वर्षांपूर्वी, आपण जो उठाव केला, त्यामध्ये देसाई यांनी खांद्याला खांदा लाऊन साथ दिली होती.
यापूर्वी स्थापन झालेले सरकार, हे नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्थापन झालेले होते. ते बाळासाहेबांना मान्य नव्हते. शिवसेना कोणाची हे जनतेने, लोकसभा निवडणूकीवेळी स्पष्ट केले आहे, अशा शब्दात, त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे . जर सरकार बदलले नसते, तर जो लाभ, गेल्या अडीच वर्षात नागरिकांना मिळाला, तो मिळाला नसता, असा दावाही, शिंदे यांनी केला.
शंभूराज देसाई नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणारा नेता आहे,असं सांगत, यावेळीही त्यांना, मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचे आवाहन, त्यांनी केले. या मतदार संघात, शंभूराज देसाई यांनी, २ हजार ९२० कोटी निधी आणल्याचं, त्यांनी सांगितलं. फेक नरेटिव्ह पसरवून, विरोधक एकदा पुढे गेले. मात्र, नेहमी हे होणार नाही, विरोधी पक्षांनी कितीही प्रयत्न केले, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade