Breaking News
कलाकारांचं मुंबईतील घराचं सप्न साकार, गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी
मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण जशी जमेल तशी मेहनत घेतच असतो. मुंबईतील घरांचे भाव आकाशाला भिडले असतानाच म्हाडाची लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी असते. त्यामुळे अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने लोकं अर्ज करत असतात. यामध्ये कलाकारही (Marathi Celebirties) मागे राहत नाही.
मुंबईत स्वतःचं घर हवं हे प्रत्येकाचे स्वप्न असते यासाठी अनेक जण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घरांना पसंती देतात. मुंबईतील विविध भागात म्हाडा ने 2030 घरांसाठी जाहिरात काढली होती . म्हाडाच्या घरासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांना संधी असते. यामध्ये पत्रकार, कलाकार यांचाही समावेश असतो. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी यंदाही अनेक मराठी कलाकारांनी अर्ज केला होता. त्यामध्ये काही मराठी कलाकारांच्या नशिबात हे घर आलं आहे. दरम्यान म्हाडाच्या गोरेगावातील केवळ दोनच घरासाठी तब्बल 27 कलाकारांनी अर्ज केले होते.
'या' कालाकारांना म्हाडाची लॉटरी
दरम्यान मराठी कलाकारांना म्हाडाची लॉटरी लागली असून यामध्ये गोरेगावचं घर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला मिळालं आहे. त्याचप्रमाणे कन्नमवार नगरमधील घर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळालं आहे. त्याचप्रमाणे पोवईमधील दोन्हीही घरं ही मराठी कलाकारांच्या नशिबात आलेली असून अभिनेता गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना ही घरं मिळाली आहेत.
गौरव आणि शिवच्या घराची किंमत
अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांना म्हाडाच्या सोडतीमध्ये पवईला घर लागलं आहे. पवईमधील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास 1 कोटी 78 लाख रुपये आहे.
27 कलाकारांचे अर्ज पण गौतमीचा नंबर
दरम्यान गोरेगांवमधील घरासाठी तब्बल 27 मराठी कलाकारांचे अर्ज आले होते. पण यामध्ये अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला ही लॉटरी लागली. यामध्ये यामध्ये बिग बॉस मराठी पर्वतींचा विजेता विशाल निकम , लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी , अभिनेत्री गौतमी देशपांडे , नारायणी शास्त्री ,अभिनेत्री किशोरी विज , रोमा बाली , तनया मालजी , अनिता कुलकर्णी , संचित चौधरी , शेखर नार्वेकर यांचा समावेश होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE