Breaking News
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खुद्द राज्य सरकारच करणार चौकशी
मुंबई - बदलापूरातील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगानं तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.
आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत उपाध्याय यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात यावं, अशी मागणी केली आहे. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलंय.
राज्य सरकारनं या संदर्भात चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. सरकारच्या चौकशी आयोगाकडून अधिनियम 1952 अंतर्गत हा तपास केला जाणारा असून या संदर्भातील अहवाल या आयोगानं तीन महिन्यात सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारनं याबाबत काढलेल्या अधिसूचनेत दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar