मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोकणी माणसांनी बांबू लागवड करून आपले गाव समृद्ध करा…

कोकणी माणसांनी बांबू लागवड करून आपले गाव समृद्ध करा…

सिंधुदुर्ग - कोकणात भात, नाचणी ,कुळीथ आणि वरी असली भरपूर कष्ट करूनही पुरेसा पैसा देत नाहीत. जमिनीत 17 हिस्सेदार,त्यामुळे घरे फुटली.गरिबी ही त्याच्या पाचवीला पुजलेली.पोट भरेना,कोकणातीत माणूस आळशी म्हणून त्याची हेटाळणी झाली.तो एक दिवस जागा झाला आणि रागाने उठला त्याने सरळ मुंबई गाठली.तिथल्या श्रीमंतीने नवलाईने,हुशारीने त्याचे डोळे दिपले.आणि इथेच घाम गाळून पैसे कमवायचे हे त्याने ठरविले.आणि तिथेच स्थिरावला.त्याने मुंबईत जाण्याची 200 वर्षाची परंपरा आजही कायम सुरु ठेवली आहे.पण कधी आपल्या पडीक वरकस जमिनीकडे लक्ष दिले नाही.

पण कोकण गरीब नाही आणि आळशी नाही.येथे भरपूर पैसे देणारे हिरवे सोने पिकते. मुंबईत राहून नोकरी धंदा करता येतो.आणि आपल्या भावी पेन्शनची सोय करता येते.हे आता सिद्ध होऊ लागले आहे. अनेक चाकरमानी आपल्या जमिनीत बांबू लागवड करू लागले आहेत. चीनची अर्थव्यवस्था बांबूवर चालते मग कोकणाची का नाही ?असा प्रश्नही त्याला पडू लागला आहे.बांबूची लागवड करून गल्लेलोट पैसा कमवता येतो.

कोकणातील निसर्ग ,येथील भूमी सह्याद्री पट्ट्यातील लांजा संगमेश्वर राजापूर, वैभववाडी, कणकवली .

कुडाळ ,सावंतवाडी परिसरातील सुपीक जमीन आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.पण त्या साठी एक करावं लागेल.वर्षानुवर्षे हरियाली सारखी जखडून असलेली नाकोरी मुळासकट उखडून टाकावी लागेल. कोकणच्या विकासाला आड ठरेल असा” पण “शब्द कायमचा पुसून टाकावा लागेल तरच शक्य आहे.

सकारात्मक विचार करायला हवा जमीनीत हिस्सेदार असले तरी, त्याच जमिनीत एकत्र बांबू लागवड करून आलेले उत्पन्न वाटून घेयला हवे. त्यासाठी एक करार केला पाहिजे.या साठी जमिनीची वाटणी करायला हवीच असं नाही.या वर विचार व्हायला हवा, तरच शक्य आहे.

कोकणात बांबू लागवडीचे महत्व आता तरुण मुलांना कळू लागले आहे.इथली स्मार्ट, हुशार तरुण मुल जमिनीत बांबू लागवड करताना पहायला मिळतात.चाकरमानी तर सर्वात पुढे आहे.म्हातारी कोतारी माणसेही म्हणू लागली आहेत.होय आमका सुद्धा बांबू लावॊक हवेत.! हे शुभ संकेत मानले जातात.

पूर्वी कोकणात श्रीमंती मोजायची फुटपट्टी एकच होती.गावात चिरे बंदी, स्लॅबची घरे आणि आंबा काजूची झाडे किती ?अलिकडे ही फुटपट्टी जुनी झाली आहे आणि लोक हिशोब बाळगू लागले आहेत.

आपल्या जमिनीत बांबूची बेटे किती ?सुदैवाने कोकण प्रांताला श्रीमंतीची ओळख उशिरा का होईना ?हळू हळू पटू लागली आहे.आपल्या गावातील पडीक जमिनीत बांबू लागवड करून गाव समृद्ध करा.बांबू लागवड करताना आपल्या वाडवडिलांनी लावून ठेवलेली चिवा काठीची मूळ लावा.त्यात पैसा आहे.सध्या नर्सरीवाल्यांचे पेव फुटले आहे.नको त्या जातीची बांबू लागवड करून फसू नका.

मराठवाड्यात बल्कोवा जातीची रोप लागवड केली पण त्यांना काटा आला आहे.आंधळा दळतंय कुत्रे पीठ खातेय अशी शासनाची अवस्था आहे.अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.कोकणातील शेतकऱ्यांनी कोणत्या तरी जातीची बांबू लागवड करून फसू नये,असे आवाहन आम्ही आज जागतिक बांबू दिनानिमित्त करीत आहोत.

कोकणी माणसाच्या डोक्यात कुणीतरी प्रेरणा घालून दिली पाहिजे.एकदा डोक्यात जर का ठिणगी बसली की तो स्वतःचा उरत नाही.तो चमत्कार करून दाखविल्याशिवाय राहणार नाही.डोक्यात प्रेरणा देण्याचे काम आम्ही करीत आहोत.”कोकण -महाराष्ट्र बांबू शेतकरी “नावाचा फेसबुक ग्रुप बनवून अवघ्या कोकणात बांबू शेती कशी चालते ?हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.साडेसात सात हजार सच्चे बांबू शेतकरी आम्ही जोडले गेले आहेत.त्यात अकाउंटंट आहेत आर्किटेक आहेत .उद्योजक आहेत आणि फिल्म डायरेकटर आहेत.एक विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.आपले गाव समृद्ध करण्यासाठी कोकणी माणसांनी बांबू लागवड करा असे आवाहन आज जागतिक बांबू दिना निमित्त करीत आहोत.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट