Breaking News
तुमचा रक्षाबंधन अविस्मरणीय पद्धतीने साजरा करा
मुंबई - रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहीण एकमेकांसोबत वेळ घालवतात. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि सणाच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतात. यंदा रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन या दरम्यान वीकेंडची सुट्टी आहे. त्यामुळे लॉंग वीकेंडचे दोन ते तीन दिवस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही आपल्या भाऊ बहिणींसोबत सहलीला जाऊ शकतात.
मथुरा वृंदावन हे भाऊ आणि बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या सुट्टीत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. मथुरा-वृंदावन भाऊ-बहिणीच्या नात्याची कथा सांगते. असे म्हटले जाते की मथुराची पवित्र नदी यमुना ही भगवान यमाची बहीण आहे. रक्षाबंधन किंवा भाईदूजच्या दिवशी भाऊ-बहिणींनी यमुनेत स्नान केल्यास भगवान यम त्यांच्या सर्व समस्या दूर करतात. मथुरामध्ये भेट देण्यासाठी अनेक प्राचीन कृष्ण राधा मंदिरे आहेत ज्यात कृष्ण जन्मभूमी, बांके बिहारी मंदिर, गोवर्धन पर्वत, द्वारकाधीश मंदिर यांचा समावेश आहे जेथे तुम्ही कुटुंबासह भेट देऊ शकता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant