मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्रशासकीय अधिकारी की नव वतनदारी ?

प्रशासकीय अधिकारी की नव वतनदारी ? 

             पुण्यात असलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावणे, रुजू होण्याआधीच व्हॉट्स अॅप मेसेज पाठवून केबीन तयार ठेवा सांगणं, ऑडी या खासगी कारवर लाल आणि निळा अंबर दिवा लावणे या गोष्टींमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली आहे.पुण्यातल्या प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण त्यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. त्यांची ओबीसी नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे. पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच बहुविकलांगता असूनही त्या वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नव्हत्या. यामुळे अधिकार गाजवण्यासाठी त्या पदावर आल्या आहेत की लोकांची कामे करण्यासाठी हा प्रश्न निर्माण होत आहे.

                 पूजा खेडकर या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी वारंवर केली. तसेच परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा केली. असा आरोप खुद्द जिल्हाधिकाऱयांनी केला आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी माध्यम प्रतिनिधी व पोलिसांना अरेरावी केल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. पोलीस चौकशीला आले असताना त्यांना बंगल्यात येऊ दिले नाही असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. या बंगल्यात पाच आलिशान कार उभ्या आहेत. ऑडी कार कुणाच्या नावावर आहे? त्यावर लावलेला दिवा कुठे आहे? याची माहिती पोलिसांना घ्यायची होती. मात्र खेडकर यांनी अरेरावी केली व पोलिसांना येऊ दिले नाही.

                आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षाशेजारी आसन व्यवस्था करण्याची मागणी केली.   प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा होत आहे. २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन काबीज केले. तसेच खासगी ऑडी वाहनावर लाल दिवा लावला. त्या सध्या वाशिम येथे रुजू झाल्या. तसेच युपीएससी परीक्षेदरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेले दावे खोटे असल्याचे अनेक लोक सांगत आहेत. तसेच त्यांची ओबीसी नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे. यावरही जोरदार टीका होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट केली आहे. तसेच पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून परीक्षेत यश मिळविल्याबद्दल कुंभार यांनी टीका करत कागदपत्रे समोर आणली आहेत.

                आयएएस पूजा खेडकर यांच्याकडे ११० एकर शेतजमीन असल्याचे समोर आले आहे. तसेच सहा प्लॉट्स आणि ७ फ्लॅट आहेत. ९०० ग्रॅम सोने आणि हिरे आहेत.

त्यांच्याकडे १७ लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ आहे. ऑडीसह चार आलिशान गाड्या आहेत. तसेच दोन खासगी कंपन्यात त्यांची भागीदारी आहे.

त्यांच्याकडे एकूण १७ कोटींची मालमत्ता आहे. नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या क्रिमिलेयर प्रमाणपत्राबद्दल साशंकता दिसते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. वडील दिलीप खेडकर यांच्याशिवाय पूजा खडेकर यांच्याकडेही कोट्यवधीची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

               पूजा खेडकर यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे गैरवर्तन यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले असून याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयएएस अधिकारी होणे हा प्रतिष्ठेचा विषय आहे. मात्र, एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची संशयास्पदरीत्या नियुक्ती व बदलीवरची प्रश्नचिन्हे आणि गैरवर्तणुकीमूळे प्रशासकीय सेवांत नववतनदारी निर्माण होत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह आहे, अशा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांपर्यंत चर्चा सुरू झाली आहे. शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, आलिशान खासगी गाडीवर लाल दिवा लावणे असे अनेक कारनामे या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने पुण्यातील प्रशिक्षण काळात केल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत खुद्द पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे सविस्तर पत्र राज्य शासनाला काही दिवसांपूर्वी लिहिले आहे.  गैरवर्तनासाठी ही बदली आहे, असा उल्लेख नसून प्रशासकीय कारणांसाठी ही बदली आहे, असे त्यात नमूद असल्याने त्यावरही साहजिकच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण आहे.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट