अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
ठाणे Convict in rape gets 20 years : डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं ती राहत असलेल्या परिसरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याच्या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील दोषारोप सिद्ध झाल्यानं कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने नराधमाला २० वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना आणखी कारावास अशी शिक्षा ठोठावली. शिवाय अपहरण प्रकरणी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शशिकांंत रामभाऊ सोनावणे असं कारावासाची शिक्षा झालेल्या नराधमाचं नाव आहे.
वडील घरी आले पण मुलगी गायब :
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी डोंबिवली पूर्व भागात कुटुंबासह राहत आहे. पीडित मुलीचं कुटुंब जुलै,२०१७ मध्ये शेजारी घरातील एका कार्यक्रमासाठी गेले होते; मात्र त्या ठिकाणी गेल्यावर घरातील आपली नऊ वर्षांची मुलगी घरात नसल्याचं वडिलांच्या निदर्शनास आलं. त्यांना मुलगी आपल्या अगोदरच मित्राच्या घरी गेली असावी असं वाटलं. तेथे गेल्यानंतर मुलगी तेथे नसल्याचं दिसलं. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलाला मुलीचा शोध घेण्यास सांगितलं. दरम्यान घटनेच्या दिवशीच पीडित मुलगी तिच्या भावाला रात्रीच्या वेळेत घराच्या परिसरात आढळली. मुलाने तिला घरी आणलं.
पीडितेने सांगितली हकीकत :
दुसऱ्या दिवशी रात्री सर्व कुटुंबीय जेवायला बसले; पण पीडित मुलगी जेवण करत नव्हती. तिला कारण विचारले तर ती काही बोलण्यास तयार नव्हती. त्यावेळी वडिलांना मुलीच्या अंगावर नखाचे ओरखाडे दिसले. आई, वडिलांना मुलीला काहीतरी झालं आहे असा संशय आला. तिला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा तिनं आपल्या आईला सांगितलं की, काल रात्री आरोपी शशिकांत सोनावणे याने जबरदस्तीने उचलून नेलं आणि बाजूच्या आंब्याच्या झाडाखाली आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. आपण बचावासाठी आरडाओरडा केला असता त्यानं आपल्या तोंडात बोटं घातली. आपणास ५० रुपये देऊन हा प्रकार कोणास सांगू नकोस म्हणून दमदाटी केली. हा प्रकार ऐकून पीडित मुलीचे पालक हादरले. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी भादंवि कलम ३६३ (अपहरण), ३७६ (अ), (ब) तसंच पोक्सोचे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली होती.
सबळ पुराव्याच्या आधारे ठोठावली शिक्षा :
या गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सूर्यवंशी यांनी करून आरोपीविरूध्द सबळ पुरावे उपलब्ध केले होते. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. आठ वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. पोलीस ठाणे-न्यायालय समन्वयक म्हणून तेजश्री शिरोळे, बाबुराव चव्हाण, समन्स अंमलदार म्हणून संपत खैरनार, अरूण कोळी यांनी काम पाहिलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपी विरुध्द सबळ पुरावे उपलब्ध असल्याने शशिकांत रामभाऊ सोनावणे याला २० वर्ष सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE