चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Paridhad Election 2024) 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून (Mahayuti) कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची एक्सक्ल्युझिव्ह माहिती एबीपी माझाचा सुत्रांनी दिली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 'या' नावांचा केंद्राकडे प्रस्ताव
पंकजा मुंडे
अमित गोरखे
परिणय फुके
सुधाकर कोहळे
योगेश टिळेकर
निलय नाईक
हर्षवर्धन पाटील
रावसाहेब दानवे
चित्रा वाघ
माधवी नाईक
विधानपरिषद निवडणुकीचं गणित काय?
जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं आहे.
कुणाकडे किती संख्याबळ ?
महायुती
भाजप : 103
शिंदे सेना : 37
राष्ट्रवादी (AP) : 39
छोटे पक्ष : 9
अपक्ष : 13
एकूण : 201
महाविकास आघाडी
काँग्रेस : 37
ठाकरे गट : 15
राष्ट्रवादी (SP) : 13
शेकाप : 1
अपक्ष : 1
एकूण : 67
एमआयएम : 2
सपा : 2
माकप : 1
क्रां. शे. प. : 1
एकूण : 6 आमदार तटस्थ
विधानसभेचं एकूण संख्याबळ : 274
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya