अभ्युदयकलादालनचा अभिनव उपक्रम
ओल्या मातीला मनासारखा आकार देत एकाहून एक सरस वैविध्यपूर्ण कलाकृती घडवण्यात आज काळाचौकी अभ्युदयनगर येथील बच्चे कंपनी निसर्गरम्य वातावरणात आपल्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्त करतानाच्या प्रयोगात दंग झाली होती.कुणी घर बनवलं तर कुणी डायनोसॉर तर कुणी डायनिंग टेबल तर कुणी कासव तर कुणी सुंदर असे फ्लॉवर पॉट बनवले
गणपतीच्या सुबक मूर्तीसुद्धा अनेकांनी बनवल्या
याला निमित्त होतं *अभ्युदयकलादालन *चा अभिनव उपक्रम!
या कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, समाजसेवक महेंद्र सातपुते, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गणेश शिंदे आणि सहकारी, जेष्ठ नागरिक संघाचे जेष्ठ नेते जिवाजी परब,जायंट्स ग्रुप मुंबई वन च्या डॅशिंग अध्यक्षा राबिया पटेल आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या डॉ अनिल आव्हाड यांचा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
या अभ्युदय कलादालनाचे संस्थापक अध्यक्ष शेखर छत्रे,डॉ प्रागजी वाझा डॉ वैशाली शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या यशाचे शिलेदार होते मूर्तिकार दत्ता केरकर, यतीन सावंत,चंद्रकांत परब,विनोद साळवी,वैशाली वानखेडे, अलका सपकाळे,नंदा म्हस्के, सुनीता गोरे,विराज भोसले, सुरेश पाष्टे,संजय कचरे, नंदू परब,नाणेकर,
या कार्यक्रमास सहकार्य करणारे नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांचे विशेष आभार!
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya