राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निष्ठावंत संघटन सेक्रटरी विश्राम नांदगावकर यांचे निधन!
मुंबई दि.३१:राष्ट्रीय मिल मजदूर संघ्याचे बंद पिरामल मिल मधील संघटन सेक्रेटरी विश्राम यशवंत नांदगावकर यांचे मुंबईत हृदयविकाराने दु:खद निधन झाले(६८).त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी असा कुटुंबपरिवार आहे.दिनांक २८ जानेवारी रोजी भोईवा डा स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला,असे शोक व्यक्त करतांना म्हटले आहे.दरम्यान रा.मि.म.संघ पदाधिकाऱ्यांच्या सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत पारपडलेल्या सभेत शोकव्यक्त ठरावाद्वारे श्रद्धांजली वहाण्यात आली आहे.सभेत खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी विश्राम नांदगावकर यांना श्रद्धांजली वहातांना म्हटले आहे, कामगारांच्या प्रश्नावरील लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे.संघटनेच्या अनेक लढ्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.ते रहात असलेल्या पानवाला सहकारी गृह निर्माण संस्थेचे खजिनदार होते.त्यांच्या निधना बद्दल कामगार वर्गात शोकव्यक्त करण्यात येत आहे.●●●
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya