Breaking News
कोरोनाचा वाढता आलेख आणि ओमायक्रॉनची वाढत चाललेली धास्ती या सगळ्या गोष्टींमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अधिक महत्वाचे पाऊलं उचलली आहेत. सगळ्यात आधी पहिली ते नववीच्या सुरु असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या, त्यानंतर जमावबंदी आणि मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक नियम या सगळ्याच बाबतीत राज्यसरकार आणि केंद्र सरकारने विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. अशातच राज्य सरकारने आता अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शाळा बंद झाल्यानंतर आता त्या मागोमाग कॉलेज सुद्धा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असून, सगळ्यांनी त्यांच्या या निर्णयाला मंजुरी सुद्धा दिली आहे. तूर्तास तरी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागण्याची कोणते चिन्ह समोर आले नाहीत. परंतु जर कोरोना रुग्णांचा आकडा हा २०,००० वरती गेला तर लॉकडाऊनचेपूर्ण संकेत राज्यसरकारकडून देण्यात आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya