भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक २०५च्या वतीने केंद्र सरकारची योजना असलेल्या ई-श्रम कार्डचं शिबिर रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शिवनेरी टेकडी (राम टेकडी) शिवडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
एका बाजूला संघटित क्षेत्रातील, खाजगी किंवा सार्वजनिक कामगार ज्यांना नियमित पगार, वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटीच्या रुपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात. तर दुसर्या बाजूला लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी काम करणारे श्रमजीवी, ज्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी. विविध योजनांचा लाभ मिळावा याकरता सदर शिबिर भरविण्यात आले आहे. तरी जास्तीतजास्त श्रमिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २०५चे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले आहे. त्याप्रसंगी शिवडी विधानसभा अध्यक्षा (युवती मोर्चा) सोनिया जेनेपल्ली आणि जान्हवी राणे, महिला अध्यक्षा प्रभाग क्रमांक २०५ उपस्थित होत्या. सदर ई-श्रम कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, वारसदाराचे संपूर्ण नाव आणि वय यांची आवश्यकता आहे. ज्यांचे वय किमान १६ ते कमाल ५९ असेल असे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. हे ई-श्रम कार्ड संपूर्ण देशात मान्य असेल. सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवडी विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर