बलाढ्य देशाचे चीफ ऑफ डिफेन्स मंत्री हरपले

        देशाच्या तिन्ही दलाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं असून, या हेलिकॉप्टर मध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. ज्यामध्ये भारतीय संरक्षण दलाचे  प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा सुद्धा समावेश होता. 

       या अपघातामध्ये बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर, उपचारा दरम्यान बिपीन रावत यांचं निधन झाल्याची बातमी, भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत शेअर केली आहे. बिपीन रावत यांसोबत त्यांची पत्नी सुद्धा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरु होते, परंतु दुर्दैवाने त्यांचे सुद्धा निधन झाले. भारतीय दलाचे चीफ डिफेन्स स्टाफ यांच्या निधनाने,खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट