तो परत येतोय...

        झी मराठी वाहिनी वरील गाजलेली मालिका देवमाणूस पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. मालिकांच्या उतरत्या क्रमामध्ये देवमाणूस या मालिकेने खूप सावरून घेतलं. याचमुळे कि काय प्रेक्षकांनी सुद्धा या मालिकेवर भरपूर प्रेम केलं. डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग, आजी, डिंपल या सगळ्या अतरंगी कलाकरांमुले हि गमालिका भरपूर गाजली. लवकरच हि मालिका पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. देवी सिंग खरंच मेला होता का ? आणि जर तो जिवंत असेल तर परत त्याच गावामध्ये येईल का ? यासारखी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला देवमाणूस या मालिकेमध्ये मिळणार आहेत.       

       नुकतंच झी मराठीने त्याच्या इंस्टाग्राम पेज वर, देवमाणूस मालिकेचा एक लहान प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये, देवी सिंगचा पुतळा आपण बघू शकतो. या मालिकेमध्ये मुख्य कलाकार म्हणून अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर सारे प्रेक्षक फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता अवघ्या पाच महिन्यात देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तूर्तास तरी या मालिकेमध्ये कोणते चेहेरे बघायला मिळतील यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे, पण हि मालिका पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार एवढं मात्र नक्की.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट