ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेची सांगता अध्यक्ष प्रताप सिंग बाजवा यांच्या उपस्थितीत झाली. पुरुष गटात दिल्ली, हरियाणा, मणिपूर पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे स्थान राहिले तर त्या खालोखाल पंजाब आणि उत्तराखंड राज्यांनी पदकांची लयलूट केली. महिला गटात हरियाणा, दिल्ली, पंजाब, छतीसगड आणी आंध्र प्रदेश राज्यांचे स्थान अव्वल राहिले.
महाराष्ट्रानेही यावेळी बक्षिसांची लयलूट केली. ४४ किलो वजनी गटात श्रद्धा घोरपडे (क्रीडा प्रबोधिनी) हिला सुवर्णपदक मिळाले. ६६ किलो वजनी गटात नाशिकच्या इशान सोनावणे याने कास्य पदक मिळवले. ५७ किलो वजनी गट – शायना देशपांडे, ठाणे हिला रौप्यपदक, ६३ किलो वजनी गट – गौतमी कांचन- रौप्यपदक, ७० किलो वजनी गट – समीक्षा शेलार, पुणे – रौप्यपदक, ७० किलो वजनी गट – शिवानी कापसे, नागपूर – रौप्यपदक, ९० किलो वजनी गटात – आदित्य परब – कास्यपदक अशी महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी राहिली. दुस-या विभागात ३० किलो वजनी गट – वेदांत मुधोळकर, यवतमाळ – सुवर्णपदक, २८ किलो वजनी गट वैभवी आहेर, नाशिक - रौप्यपदक, ४० किलो वजनी गट – रुद्राक्ष तांबोळकर – कास्य पदक, ४४ किलो वजनी गट – भक्ती भोसले, ठाणे – कास्यपदक. ज्येष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक यतीश बंगेरा, आंतरराष्ट्रीय पंच योगेश धाडवे, राष्ट्रीय पंच शिल्पा शेरीकर, विजय यादव यांचाही या स्पर्धेत सहभाग राहिला.
रिपोर्टर
Adarsh Swarajya
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya