लसीकरणालासाठी जसलोक हॉस्पिटलसह सिटी बँकेचा हातभार
नवी मुंबई ः तिसर्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी 110 हून अधिक केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका क्षेत्रातील गरजू घटकांकरिता सिटी बँकेच्या सीएसआर निधीमधून चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने लसीकरण करण्यात येणार आहे.
सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाच्या कक्षेत यावेत यादृष्टीने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून दुसर्या डोस विहित कालावधीतच दिला जावा याकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे. संभाव्य तिसर्या लाटेचे उद्दिष्ट नजरसमोर ठेवून लसीकरणाला गती दिली जात असताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू घटकांकरिता सिटी बँकेच्या सीएसआर निधीमधून चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने लसीकरण करण्याचा प्रस्ताव जसलोक रूग्णालयामार्फत महानगरपालिकेस प्राप्त झाला. त्यास पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली. या विशेष लसीकरण मोहीमेकरीता जसलोक रूग्णालयामार्फत कोव्हिशील्ड लसीचे 25 हजार डोस उपलब्ध झाले असून 16 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 22/11 तुर्भे या ठिकाणी तुर्भे स्टोअर परिसारातील नागरिकांसाठी, महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे या ठिकाणी इंदिरानगर, हनुमाननगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, गणेशपाडा, श्रमिकनगर परिसरातील नागरिकांसाठी तसेच नमुंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणे या ठिकाणी कोपरखैरणेगांव येथील नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष लसीकरण सत्रात लसीकरणाचा लाभ घेण्याकरिता चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या परिसरातील 18 वर्षावरील नागरिकांना ओळखपत्रे देण्यात आली असून पुढील 7 ते 10 दिवस ही विशेष लसीकरण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या 25 हजार डोसेस नंतरही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी जसलोक हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत 7 लक्ष 29 हजार 847 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 2 लक्ष 64 हजार 627 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. अशाप्रकारे 9 लक्ष 94 हजार 474 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya