मालमत्ताकर वसूलीसाठी टारगेट ओरिएन्टेड वर्क
प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांवर कारवाई होणार
नवी मुंबई ः संपूर्ण क्षमतेने काम केले तर सरासरी वसूलीच्या दीडपट अधिक वसूली शक्य होऊ शकेल त्यामुळे तसे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मालमत्ताकर विभागाने थकबाकी वसूलीसाठी प्रत्येक पातळीवर कामाची गती वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मालमत्ताकर विभागाच्या मुख्यालय पातळीवरील अधिकार्यांच्या विशेष बैठकीप्रसंगी त्यांनी मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि इतर अधिकार्यांना टारगेट ओरिएन्टेड वर्क करण्याच्या सूचना केल्या.
मालमत्ताकर वसूलीसंदर्भात नियमित आढावा घेत असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी नोटीसा बजावूनही त्याला प्रतिसाद न देणार्या 161 थकबाकीदारांवर करण्यात येणार्या पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली व त्यामध्ये सुधारणा सूचविल्या. 50 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे 568 थकबाकीदार असून 161 मालमत्तांची अटकावणी केलेली आहे. इतर काहींमध्ये दुबार देयके, देयकांमधील दुरूस्त्या अशा अडचणी आहेत. याबाबत विविध अधिकार्यांची एक समिती तयार करून त्या समितीच्या माध्यमातून दुबार देयकांबाबत तसेच दुरूस्तीबाबतची कार्यवाही केली जावी, जेणेकरून कालबध्द पध्दतीने व पारदर्शकतेने कार्यवाही होऊ शकेल अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. आत्तापर्यंत अटकावणी केलेल्या 161 मालमत्तांची जप्ती/लिलाव यांची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व इतर मालमत्तांबाबत जप्ती/अटकावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. जप्ती/लिलाव या प्रकारची कारवाई थकबाकीदार खातेदारांपैकी फक्त मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांविरूध्दच केली जात असून जर अशा थकबाकीदार खातेदारांना सदर कारवाई टाळण्यासाठी थकीत कर भरण्याची इच्छा असेल तर ती प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना आणि संपूर्णत: पारदर्शक पध्दतीने पूर्ण करण्याबाबत आयुक्तांनी आग्रही भूमिका मांडली.
सन 2019-20 मध्ये 12 ऑगस्टपर्यंत 178 कोटी मालमत्ताकराची वसूली झाली होती. ती यावर्षी 2021-22 मध्ये 12 ऑगस्टपर्यंत 180 कोटी इतकी झाली आहे. यापुढील काळात ही गतिमानता अधिक वाढविणारी कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. मोबाईल टॉवरची थकबाकी या विषयावर सविस्तर आढावा घेऊन आठवड्याभरात कार्यवाहीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले. झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट या तत्वानेच संपूर्ण कर रक्कमेची वसूली व्हावी या दिशेने विभागाने मार्गाक्रमण करणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी सांगितले व त्याविषयी गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya