मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रिलायन्स इंडस्ट्रिजकडून पालिकेला 10 व्हेंटिलेटर्स

नवी मुंबई ः पालिकेमार्फत आरोग्य सुविधांची परिपूर्ती केली जात असताना त्यामध्ये कोव्हीडच्या सुरूवातीपासूनच अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योगसमुह यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. अशाच प्रकारे रिलायन्स इन्डस्ट्रिज लि. यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दहा अद्ययावत व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेले आहेत.

सध्या कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली जात असताना त्यामध्येही विविध संस्था, उद्योगसमुह यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. रिलायन्स इन्डस्ट्रिज लि. यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दहा अद्ययावत व्हेंटिलेटर्स पालिकेस प्रदान करण्यात आलेले आहेत. महापालिका मुख्यालयात हे व्हेटिंलेटर्स प्रादन करताना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयु्कत सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच रिलायन्स इंडस्ट्रिजचे सहा. उपाध्यक्ष ए.व्ही.बेटकेकर, महाव्यवस्थापक शरद ओगले, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वीही मे.लालन कापडिया इंड. यांचेकडून 3 व्हेंटिलेटर्स, मे.हिदुस्थान प्लॅटिनम यांचेकडून 2 व्हेंटिलेटर्स तसेच मे.नोसील लिमी., मे.ग्रीन स्पेस लिमी., मे.कान्सबर्ग इं.लि. आणि मे.कुकरेजा लिमी. यांचेकडून प्रत्येकी 1 व्हेटिलेटर नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे. विविध उद्योगसमुहांकडून अशाप्रकारे वैद्यकीय उपकरणांचे सहकार्य लाभल्याने महानगरपालिकेच्या कोव्हीड विरोधी लढ्याला सामाजिक उत्तरदायित्वाचे बळ लाभले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट