Breaking News
मुंबईः कोरोनामधून सावरलेल्या अर्थव्यवस्थेला दुसर्या लाटेमुळे मोठा धक्का बसला. आर्थिक आघाडीवरील पुढे येणार्या आकडेवारीमुळे परिस्थिती तपशिलासह पुढे येत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे आर्थिक पुनर्प्राप्तीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन मोठ्या प्रमाणात शिथिल झाल्याने जुलै महिन्याचं चित्र वेगळं असलं तरी जूनमध्ये औद्योगिक उत्पादनवाढीचा दर केवळ १३.६ टक्के होता. मे महिन्यात हाच दर २९.३ टक्के होता. मासिक आधारावर ही मोठी घसरण ठरली.
एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशाच्या बहुतांश भागात स्थानिक पातळीवर टाळेबंदी करण्यात आली होती. यामुळे, उद्योगजगतातल्या सुधारणांवर फारच प्रतिकूल परिणाम झाला. जुलैपासून टाळेबंदी हळूहळू शिथील करण्यात आली. त्यामुळे उद्योग पुन्हा रुळावर येऊ लागला असला तरी आकडेवारी पाहिली की नेमकं चित्र समोर येतं. दरम्यान, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्रात जून महिन्यात १३ टक्के वाढ नोंदवली गेली. खाण उत्पादन २३.१ टक्क्यांनी वाढलं तर वीजनिर्मिती ८.३ टक्क्यांनी वाढली.
मे महिन्यात निर्मिती क्षेत्राशी संबंधित घटकांच्या वाढीचा निर्देशांक २९.३० टक्के होता. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या वाढीचा दर केवळ १३ टक्के होता. मे महिन्यात तो३४.५ टक्के होता. विजेच्या वाढीचा दर ७.५ टक्क्यांच्या तुलनेत ८.३ टक्के, खाणक्षेत्रातल्या वाढीचा दर २३.३ टक्क्यांच्या तुलनेत २३.१ टक्के, प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनाचा दर १५.८ टक्क्यांच्या तुलनेत १२ टक्के, भांडवली वस्तूंच्या उत्पादनाचा दर ८५.३० टक्क्यांच्या तुलनेत २५.७ टक्के होता. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनवाढीचा दर २२.२ टक्के राहिला. मे महिन्यात तो ५५.२ टक्के होता. इन्फ्रा वस्तूंच्या वाढीचा दर ४६.८ टक्क्यांच्या तुलनेत १९.१० टक्के होता. ग्राहक टिकाऊ वस्तू दर ९८.२० टक्क्यांच्या तुलनेत ३०.१० टक्के, ग्राहक नॉन-टिकाऊ वस्तू ०.८० टक्क्यांच्या तुलनेत उणे ४.५ टक्के राहिला. दोन्ही महिन्यांचा विकास दर वेगवेगळ्या क्षेत्रांच्या वार्षिक आधारावर बेतला आहे. मे २०२० मध्ये टाळेबंदीमुळे विकास दर खूप कमी होता, त्यामुळे मे २०२१ मध्ये वाढीच्या दरात उडी दिसली. जून २०२० मध्ये टाळेबंदी असल्यामुळे हा विकास दर कमी दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya