ट्रेन प्रवासासाठी 11 रेल्वे स्टेशनवर मदत कक्ष
नवी मुंबई ः कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून 15 ऑगस्टपासून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोव्हिड डोस घेतल्याचे प्रमाणित करण्यासाठी 11 रेल्वे स्थानकांवर 11 ऑगस्टपासून मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. नागरिकांना आवश्यक त्या कागदपत्रांची मुर्तता करुन पाससाठीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कोव्हिडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवासकरण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रमाण कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस होऊन गेले आहेत अशा नागरिकांना मासिक सिझन पासवर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. अशा नागरिकांना त्यांच्या फोटोसह असलेला युनिव्हर्सल पास देण्यात येणार असून याव्दारे रेल्वे काऊन्टरवर मासिक सिझन पास घेता येणार आहे. त्यानंतर प्रवास करताना प्रवाशाने मासिक सिझन पाससोबत युनिव्हर्सल पासही सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्तर 3 आणि त्यापेक्षा अधिक लेव्हल्स ऑफ रेस्ट्रिक्शन स्तराच्या मर्यादेत हा पास वापरता येईल.
या प्रमाण कार्यप्रणालीनुसार कोव्हीडचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत हे तपासून प्रमाणित करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाला रेल्वे स्थानकांमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, राबाडे, ऐरोली या 11 रेल्वे स्टेशनवर उदया सकाळी 7.00 वा. पासून रात्री 11.00 पर्यंत विशेष मदत कक्ष कार्यान्वित असणार आहेत. संबंधित विभाग कार्यालयांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हेच या कार्यवाहीचे विभागीय नोडल अधिकारी असणार असून महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार याचे मुख्य नियंत्रक अधिकारी असणार आहेत.
कसा मिळणार पास?
नागरिकांनी आपल्या दोन कोव्हीड डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्डची प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवरील महानगरपालिकेच्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावयाचा आहे. मदत कक्षावरील कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळतील व त्यावर विशेष शिक्का लावून लसीकरणाचे प्रमाणपत्र युनिव्हर्सल पाससाठी प्रमाणित करतील. ही मुद्रांकीत कागदपत्रे रेल्वे पास काऊन्टरवर दाखविल्यानंतर त्यांना मासिक सिझन पास देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल. या विशेष मदत कक्षावरील कार्यवाहीकरीता सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 आणि दुपारी 3.00 ते रात्री 11.00 अशा दोन सत्रात 100 हून अधिक कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच युनिव्हर्सल पास देणेबाबत ऑनलाईन अॅपदेखील शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya