2 लक्ष 37 हजार नागरिकांनी घेतले दोन्ही डोस
नवी मुंबई ः कोव्हीड लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लक्ष दिले जात आहे. आत्तापर्यंत 7 लाखाहून अधिक नागरिक कोव्हीड लसीचा पहिला डोस घेत संरक्षित झाले आहेत. तसेच 2 लक्ष 37 हजार 513 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच यापुढील काळात अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोव्हीड लसीकरणाला वेग देण्यासाठी शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी 7 लाख 1 हजार 939 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 2 लक्ष 37 हजार 513 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. एकूण 9 लक्ष 39 हजार 452 कोव्हीड लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जात आहे तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.
- लसीकरण लाभार्थी
डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी
पहिला डोस 33637
दुसरा डोस 22259
पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे
पहिला डोस 29625
दुसरा डोस 18077
60 वर्षावरील नागरिक (60+)
पहिला डोस 83305
दुसरा डोस 65576
45 ते 60 वयोगटातील नागरिक (45 ते 60)
पहिला डोस 181929
दुसरा डोस 105124
18 ते 45 वयोगटातील नागरिक
पहिला डोस 373443
दुसरा डोस 26477
एकूण
पहिला डोस 701939
दुसरा डोस 237513
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya