Breaking News
नवी मुंबई : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षांचे अंतिम प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींनी स्वत: उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावे, अशा सूचना सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वार औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड यांनी दिल्या आहेत.
अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017), आणि 107 वी (एप्रिल 2018), शिकाऊ उमेवारी योजने अंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षांचे अंतिम प्रमाणपत्र मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र पनवेल या आस्थापनेमध्ये डी.जी.ई.टी नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. सदर प्रमाणपत्र वितरणासाठी उपलब्ध आहेत. तरी संबधित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवशी स्वत:उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावेत. (सोबत मूळ गुणपत्रक आणावे). अशा सूचना सहायक प्रशिक्षण सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड यांनी केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya