Breaking News
मुंबई ः कोरोना महामारीची दुसरी लाट गेल्या अनेक दिवसांपासून ओसरताना दिसत आहे. त्यामुळे व्यापारी आणि सामान्यांनी निर्बंध शिथिल करत दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुकानांच्या वेळा वाढवत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार ुज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्येच दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
आज संध्याकाळपासून दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची आकडेवारी जास्त प्रमाणात आहे त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई लोकल आणि वर्क फ्रॉम होमवरही भाष्य केलं. शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करायला लावा. उद्योगांनी शक्य असेल तिथं बायो बबल करणे आणि आरोग्याचे नियम पाळत सुरक्षितरित्या उत्पादन कशाप्रकारे करता येईल याचा विचार करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुंबई लोकलबाबत अद्याप निर्णय घेता येणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार असून केंद्रानेही तशाप्रकारचे आदेश दिल्याचं ठाकरे म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya