एपीएमसी परिसरात कारमध्ये स्पार्क
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे.
तुर्भे स्टेशन भागातून माथाडी भवनाच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. एपीएमसी परिसरात टाटा इंडिका या धावत्या कारमध्ये अचानक स्पार्क झाला. यानंतर त्या गाडीत अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, पेट घेतलेल्या कारमध्ये अक्षरश: स्फोट होत होते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वाशी अग्निशमन दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही कार पूर्णत: जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे तुर्भे ते माथाडी भवन रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya