जुलैमध्ये 2 लाख 16 हजाराहून अधिक कोव्हीड टेस्टींग
नवी मुंबई ः मिशन ब्रेक द चेन अंतर्गत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. जुलै महिन्यातच तब्बल 2 लाख 16 हजार 411 नागरिकांचे टेस्टींग करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 1 लक्ष 63 हजार 504 नागरिकांचे अँटिजेन तसेच 52 हजार 907 नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी 7 हजार नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे.
दैनंदिन वेबसंवादामधील चर्चेतील निरीक्षणानुसार आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ज्या ठिकाणी कोव्हीड रूग्ण आढळतो त्या इमारतीमधील सर्व नागरिकांच्या टेस्टींगला महानगरपालिकेने महिन्याभरापासून सुरूवात केलेली आहे. या टेस्टींगमुळे एरव्ही जे रूग्ण कोव्हीडची कोणतीही दृश्य लक्षणे दिसत नसल्यामुळे समाजात मिसळत राहिले असते व कोव्हीडचे वाहक झाले असते, ते रूग्ण वेळीच आढळून आल्याने त्यांचे विलगीकरण होऊन त्यांच्यापासून होणारा कोव्हीडचा प्रसार तिथेच रोखला जात आहे. यामुळे आज काही प्रमाणात कोव्हीड रूग्णांची संख्या वाढलेली दिसत असली तरी ते पुढील प्रसार रोखण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी टेस्टींगमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आलेली असून एका जुलै महिन्यातच तब्बल 2 लाख 16 हजार 411 नागरिकांचे टेस्टींग करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 1 लक्ष 63 हजार 504 नागरिकांचे अँटिजेन तसेच 52 हजार 907 नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी 7 हजार नागरिकांचे टेस्टींग करण्यात येत आहे.
ज्या इमारतीत पॉझिटिव्ह रूग्ण आढळतो त्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे तसेच बैठ्या घरांतील आसपासच्या नागरिकांचे टारगेटेड टेस्टींग करण्यात येत असून त्यासोबतच सर्व रेल्वे स्टेशन्स, एपीएमसी मार्केटची प्रवेशव्दारे, बाजार व वर्दळीच्या जागा याठिकाणीही टेस्टींगवर भर देण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या साधारणत: 15 लक्ष लोकसंख्येच्या तुलनेत 13 लक्ष 93 हजाराहून अधिक नागरिकांचे टेस्टींग करणारी नवी मुंबई ही लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक कोव्हीड टेस्टींग करणारी महानगरपालिका आहे. टारगेटेड टेस्टींगला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya