Breaking News
नवी मुंबई ः कोरोना महामारीच्या काळात तिसर्या लाटेची संभावना वाटत असल्याने याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्जीबिशन सेंटर येथील कोव्हीड रुग्णालयात 4 व्हेंटिलेटर व बिपअप मशीनचे वाटप शुक्रवारी उपनेते, चेअरमन - मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, मा. स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील, मिलिंद सूर्यराव, मा. नगरसेवक आकाश मढवी, राजू कांबळे, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सुजाता ढोले यांनी कोविड -19 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोविड संजीवनी हा पुरस्कार दिल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, यांचे अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya