तुर्भे झोपडपट्टीत पालिका उभारणार सुसज्ज रुग्णालय
शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुसज्ज रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागात असलेले जिल्हा परिषदेचे गोडाऊन ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर या भागातील गोरगरीब रुग्णांची वैद्यकीय उपचारासाठी होत असलेली परवड आता थांबणार आहे. दरम्यान तुर्भे स्टोअर्समध्ये रुग्णालय सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. याप्रसंगी तुर्भे स्टोअर्समधील रुग्णालयाच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हे रुग्णालय लवकरात लवकर उभे केले जाणार आहे. या भागात असलेल्या गोडाऊनचे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासन यांच्या दरम्यान बैठकाही झाल्या आहेत. हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णालयाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. या शिष्टमंडळामध्ये माजी विरोधी पक्षनेते आणि राज्य सरकारच्या वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर इतर शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
- स्मशानभुमीचा प्रश्नही मार्गी लागणार
तुर्भे स्टोअर्स परिसराची लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. मात्र याठिकाणी स्मशानभुमी नाही. त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तीवर अत्यंसंस्कार करण्यासाठी येथील नागरिकांना थेट तुर्भे गावच्या स्मशानभुमीत यावे लागते. - ही फरपट थांबविण्यासाठी याच भागात स्माशानभुमी तयार करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी स्मशानभुमीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने डंपिंग ग्राऊन्डच्या एका कोपर्यात स्मशानभुमीसाठी जागा देण्याचे नियोजन केले आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya