आयसीयू कक्ष निर्मितीसाठी 12 ऑगस्टची डेडलाईन
कोव्हिड रुग्णांसाठी ऐरोली व नेरूळ रूग्णालयात आयसीयू बेड्स ; कामांची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई ः कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. या अनुषंगाने त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या ऐरोली व नेरूळ येथील सार्वजनिक रूग्णालयांना भेट देत त्याठिकाणी कोव्हीड रूग्णांसाठी करण्यात येत असलेल्या प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स निर्मिती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांना 12 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.
ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात सध्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर तसेच नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात सध्या पाचव्या, सहाव्या व सातव्या मजल्यावर आयसीयू कक्ष निर्मितीचे काम सुरू असून या कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्तांनी 12 ऑगस्टपर्यंत 24 तास तिन्ही शिफ्टमध्ये काम सुरू ठेवून स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले. या तिन्ही बाबींबाबत परस्पर समन्वय ठेवून वेळेत कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी आपल्या रूग्णालयात सुरू असलेले काम योग्य प्रकारे होत असल्याची नियमित लक्ष ठेवून खात्री करून घ्यावी असेही निर्देशित केले.
- नेरूळ व ऐरोली या दोन्ही रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयांच्या दृष्टीने रूपांतरण करण्यात येत असून त्याठिकाणी प्रत्येकी 200 आयसीयू बेड्सची उभारणी केली जात आहे.
प्रत्येक रूग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी 80 बेड्सचा पेडियाट्रिक वॉर्ड तसेच कोरोनाबाधित गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांसाठी 50 बेड्सचा विशेष वॉर्ड निर्माण केला जात आहे. महत्वाचे म्हणजे ही दोन्ही रूग्णालये प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स सुविधेने परिपूर्ण होत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya