Breaking News
मुंबई ः सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचे निकाल शुक्रवारी घोषित झाले. यात 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी 14 लाख 30 हजार 188 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी रेग्युलर विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 4 हजार 561 असून त्याचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 96 हजार 318 आहे. दिल्लीतील 2 लाख 91 हजार 606 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 91 हजार 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण झालेली टक्केवारी 99.13 टक्के इतकी आहे. दिल्ली विभागात यावर्षी 99.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ललीशीर्शीीश्रींी.पळल.ळप या वेबसाईटवर व अन्य काही डिजीटल अॅपवर निकाल बघता येणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya