पालिकेकडून रखडलेल्या प्रकल्पांना गती
वाशीतील तरणतलाव व व्यावसायिक संकुलाच्या कामाचे आदेश
नवी मुंबई : गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रार्दुभावामुळे पालिकेने आरोग्य सेवेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे व मोठे प्रकल्प रखडले होते. मात्र आता कोरोनाच्या उपाययोजना व नियोजनाबरोबर पालिकेने रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. नेरुळ येथील विज्ञान केंद्राच्या कामाचे आदेश दिल्यानंतर आता रखडलेला ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव व वाशी येथील एनएमएमटी बस स्थानकावरील व्यावसायिक संकुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लागणार आहेत.
कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी पालिकेनेही आरोग्य सेवेकडे लक्ष दिले आहे. इतर विभागातील कर्मचारी व अधिकारीही नागरिकांना सेवा देण्यात गुंतले होते. त्यामुळे शहरातील इतर विकासकामे रखडली होती. मात्र आता पालिकेने कोरोनाबरोबरच इतर नागरी सुविधांच्या पुर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार पालिकेने वाशी सेक्टर 12 येथ भूखंड क्रमांक 196 व 196 अ प्रस्तावित तरणतलावाच्या महत्त्वपूर्ण कामाला कार्यादेश दिला असून ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपातील कामाला सुरुवात केली आहे. तरणतलाव पुढील दोन वर्षांत खेळांडूसाठी सरावासाठी उलब्ध होईल, असे नियोजन आहे. 2023 पर्यंत शहरात ऑलिम्पिक दर्जाचा पहिला तरणतलाव निर्माण होणार असून त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरातील खेळाडूंना जलतरणासाठी शहराबाहेर जावे लागत होते, ती समस्या दूर होणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामासह एनएमएमटीचे बसस्थानक तसेच वाणिज्य संकुलही रखडले होते. या कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. यासाठी अंदाजित 124 कोटी खर्च अपेक्षित होता. नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने परिवहन उपक्रमाला आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी शहरातील परिवहनच्या बसस्थानकांचा वाणिज्यिक वापरासाठी जास्तीत उपयोग करून त्यातून परिवहन उपक्रमाला आर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya