मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेचे वैद्यकीय पथक रवाना

नवी मुंबई ः कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने शनिवारीच महाड भागाकडे रवाना झाले असून त्यांनी त्याठिकाणी मदतकार्यास सुरूवात केलेली आहे.

कोकणातील अनेक भागांमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. याकरिता तेथील शासकीय विभागांच्या मागणीनुसार आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता केली जात आहे. अशाचप्रकारे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय मदतकार्य पथक आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्यासह रविवार 25 जुलै रोजी रात्री 11 वा. चिपळूणकडे रवाना झालेले आहे. डॉ. प्रशांत अहेर, डॉ. पंकज तितार, डॉ. उज्वल नाईक या वैद्यकीय अधिका-यांसह फार्मासिस्ट, ब्रदर, वॉर्डबॉय व स्वयंसेवक असे 12 जणांचे हे वैद्यकीय मदतकार्य पथक चिपळूणमध्ये तेथील आरोग्य जपणुकीचे काम करणार आहे. शनिवारी महाडला मदतकार्याहाठी पालिकेचे एक पथक रवाना झाले. मदतकार्याची वाढती गरज लक्षात घेऊन माणगांवच्या प्रांत प्रशांती दिघावकर यांच्या विनंतीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने रविवारी स्वच्छता निरीक्षक विजय पडघन व उपस्वच्छता निरीक्षक दिपक शिंदे यांचेसह 20 स्वयंसेवकांचे आणखी एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह महाडच्या दिशेने रवाना केले असून त्यांनीही तेथे पोहचून लगेच मदत कार्यवाहीस सुरूवात केलेली आहे. या पथकासोबत मिनी ट्रक, मिनी टिप्पर, 4 पाण्याचे टँकर, 2 टन कार्बोलिक पावडर पाठविण्यात आलेली आहे. तसेच या पथकासमवेत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या सेवाभावी संस्थेने तेथील आपद्ग्रस्तांसाठी 7 हजार लि. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, सतरंजी, ब्लँकेट, सॅनिटरी पॅड्स पॅकेट्स तसेच शेल्टर असो. या सेवाभावी संस्थेने 5000 अंघोळीचे साबण असे साहित्य पाठविलेले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट