घरफोडी करणारे त्रिकुट जेरबंद
16 मोबाईल फोनसह 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल ः पनवेलमधील एका मोबाईल दुकानात घरफोडी करुन मोबाईल फोन व इतर साहित्याची चोरी केली होती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांनी तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 मोबाईल, 6 हेडफोन, मोबाईल संबंधित इतर साहित्य, सोन्याची अंगठी व पान असा एकूण 2 लाख 28 हजार 840 रुपये किंमचीचा मुद्दामाल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मोबाईल शॉप येथील दुकानात चोरट्यांनी घरफोडी करुन मोबाईल फोन व इतर साहित्य चोरल्याप्रकरणी 30 जुन रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार पोलीसांनी तपास केला सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आरोपीच्या हातावर व दुसर्या आरोपीच्या मानेवर टॅटू असल्याचे दिसत होते. त्यानुसार गोपनीय बातमीदारामार्फत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सदर तीन आरोपींना पंचशिलनगर झोपडपट्टी नवीन पनवेल येथून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. निलेश दामोदर (21), समीर धुलप(28), महेश चवरकर (30) अशी आरोपींची नावे आहेत. हे तीनही आरोपी मित्र असून ते रात्रीच्या वेळी कटावणी व स्कु ड्रायव्हरच्या मतदीने दुकान व घर फोडून चोरी करतात. घरफोडीतून मिळवलेल्या वस्तू नाक्यावरील कामगार लोकांना विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून 2 लाख किंमतीचे 16 मोबाईल फोन, 19,100 रुपयांचे 6 हेडफोन, स्मार्ट वॉच, वॉच चार्जर, स्मार्ट चार्जर, युएसबी वायर, 5000 किमंतीचे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, 3000 रोख रक्कम व कटावणी व स्कु्र ड्रायव्हर इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींवर यापुर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत.
सायकल चोरी करणारा अटकेत
रायगड बाजार परीसरातून पर्समधील सोन्याचे मंगलसुत्र चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्यात गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश जाधव(35) याला कोळीवाडा पनवेल येथून ताब्यात घेतले. हा आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पर्स चोरी करणे तसेच बिल्डींगच्या पार्कींगमध्ये लावलेल्या सायकली चोरी करत असे. सदरच्या सायकली भंगार म्हणून स्वस्तात विकतो असे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व 70 हजार किंतमीच्या 13 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कारवाई पथक
पोलीसांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण केलेल्या तपासामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाई पथकामध्ये पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे, पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशि युवराज राऊत, पोशि, विवेक पारासुर, पोना विनोद पाटील, पोशि यादराव घुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि खेडकर व भगवान साळुंखे यांचा समावेश होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya