मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चोरीच्या सात दुचाकी व सहा मोबाईल हस्तगत

विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्या मध्ये घडलेल्या मोटार सायकल चोरी, मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याअंतर्गत मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेकडून दुचाकी मोटार वाहन चोरी व मोबाईल स्नॅचिंग करणार्‍या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून सात मोटार सायकल व सहा मोबाईल फोन असा सुमारे 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

मध्यवती कक्षाचे पोलीस अमंलदार लक्ष्मण कोपरकर व राहुल वाघ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार  मोटार सायकल व सहा मोबाईल चोरी करणारे दोन विधीसंघर्ष बालक यांना उलवे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळील दुचाकींविषयी चौकशी केली असता पनवेल शहर येथून त्या चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली. तसेच पनवेल, पनवेल तालुका, खांदेश्‍वर, न्हावाशेवा, खारघर, रबाळे, उरण येथून त्यांनी 8 मोटार सायकल चोरी केल्याचीही कबुली दिल्याने त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटार सायकल हस्तगत केल्या. तसेच 95 हजार रुपयांचे 6 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्यांनी उलवे, सानपाडा, खारघर, कळंबोली या परिसरातून स्नॅचिंग केल्याचे सांगितले. मोटारसायकल व मोबाईल असा एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अधिक तपास सुरु आहे. हे बालअपचारी मोटार सायकल चोरी करुन त्याचा वापर मोबाईल स्नचिंग करीता वापरत असून नंतर त्या मोटार सायकल उलवे येथील बामडोंगरी रेल्वे स्टेशनचे पॉर्किंगमध्ये सोडून देत होते. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट