पेटीएमचा गैरवापर करुन फसवणुक करणारे अटक
नवी मुंबई ः विवीध दुकानामधुन तसेच मॉलमधुन महागडे वस्तु, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमव्दारे सदर खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधीत विक्रेत्यांना दाखवुन त्यांची फसवणुक करणार्या दोघांना वाशी पोलीसांनी अटक केली आहे.
वाशी पोलीस ठाणे हद्दीत वाशी जुहु गाव येथील अदा बुटीक, येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून 38,000 रू कीमतेचे बिल पेटीएमन्दारे पेड केले असे भासवुन दुकानदार यांना पैसे पेड केल्याचा पेटीएम अॅपचा खोटा मेसेज दाखवुन अदा ब्युटीक या कपडयांचे दुकानाची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने संक्षयीत आरोपीतांचा शोध लावला. त्यामध्ये मुख्य आरोपी नामे प्रेम नवरोत्तम सोलंकी वय -31 वर्षे, तसेच त्याची मैत्रीण प्रिती राजेश यादव, ( उर्फ तन्ची शर्मा ) वय 23 वर्षे, हीचे सह दुकानात प्रवेश करून खरेदीसाठी पती - पत्नी असल्याचे व खोटे नाव सांगुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फसवणुक करताना ते पेटीएम स्पुफ नावाचा अॅपलेकशन व्दारे बनावट बिल पेड केल्याची पावती तयार करून दुकानदारांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीताकडुन गुन्हयातील फसवणुक केलेले 38,000 रू. व कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींताना वाशी न्यायायला समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya