Breaking News
किंमत 2 लाख 88 हजार रुपये ; तळोजा पोलीसांची कामगिरी
पनवेल : तळोजा परिसरातून वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल गहाळ झाले होते. तळोजा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोध घेेऊन हे मोबाईल बुधवारी (24 मार्च) परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना वाटप करण्यात आले.
तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय नाळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुधीर निकम, पोलीस हवालदार वैभव शिंदे, पोलीस नाईक वैभव शिंदे, दुर्वास पाटील, सचिन पवार, पोलीस शिपाई प्रवीण पाटील, अभिजीत दगडे, संदीप माने आदींच्या पथकाने याचा तपास करण्यात आला. तळोजा परिसरासह तसेच लातूर, त्र्यंबकेश्वर, चाळीसगाव, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई परिसरात हे मोबाईल वापरण्यात येत असल्याची माहिती तांत्रिक तपासाद्वारे निष्पन्न झाले. या कारवाईत हस्तगत केलेले 25 मोबाईल संबंधित नागरिकांना प्रत्यक्षात वाटप करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya