Breaking News
दोन अटकेत, एक फरार तर एकाने केेली आत्महत्या
पनवेल ः महागड्या गाड्या वेगवेगळ्या कंपनीत भाड्याने लावतो असे सांगून लोकांकडून बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून सदर गाड्या परस्पर विकणार्या टोळीपैकी दोघाजणांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तर यातील तिसर्या आरोपीने आत्महत्या केली असून चौथ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
पनवेल परिसरातील तसेच मुंबई येथील डी.बी.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील विविध लोकांना तुमच्या नवीन गाड्या आम्ही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये भाड्याने लावतो व त्याबद्दल तुम्हाला दरमहा 18 हजार रुपये देवू, असे सांगून रितसर करार करून सुरूवातीचे काही महिने ठरलेले भाडे देवून त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करून लोकांकडून घेतलेल्या गाड्या परस्पर विकून टाकण्याचा प्रकार या टोळीमार्फत करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मुंबई येथील एका संगणक व्यावसायिकाला 1 करोड 08 लाख 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सुद्धा या टोळीविरुद्ध दाखल करण्यात आली होती. या संदर्भात पोलिस पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या नुसार सदर आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी राजशेखर गौडा (50) याने आपण पकडले जावू या भितीने आत्महत्या केली आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुरज पाटील व करण उर्फ जगदीश चौधरी यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन पकडून त्यांच्याकडून जवळपास 41,68,000 रुपये किंमतीची दहा वाहने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा ऐेवज हस्तगत करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya