पोस्टाचे बनावट दस्तऐवज बनविणारी चौकडी जेरबंद
- by
- Jan 22, 2021
- 1028 views
नवी मुंबई ः भारतीय डाक विभागाचे किसान विकास पक्ष व राष्ट्रीय बचत पत्र बनावट तयार करुन ते खरे असल्याचे भासवून बँकेत गहाण ठेवून कर्ज घेणार्या टोळीला जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलीसांना यश आले आहे. आरोपींकडून 5 कोटी रुपयांचे वेगवेगळ्या किमंतीचे भारतीय डाक विभागाचे एकुण 18 बनावट किसान विकास पत्र, 6 राष्ट्रीय बचत पत्र, दोन चारचाकी, रबरी स्टॅम असा एकून जवळपास 6 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बाबाराव गणेशराव चव्हाण (24), सुप्रभात मल्लनप्रसाद सिंग (50), संजयकुमार अयोध्या प्रसाद (46), दिनेश रंगनाथ उपाडे ( 39) अशी आरोपींची नावे आहेत. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी पनवेल येथील एचडीएफसी बँक येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजयकुमार लांडगे व पोनि. (गुन्हे) संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोउपनिरी सुनिल तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलंदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावला होता. तेथे दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतेली असता त्यांचेजवळ भारतीय डाक विभागाची 2 बनावट किसान विकास पत्र व 7 बनावट राष्ट्रीय बचत पत्रे एसे एकुण 9 बनावट दस्तऐवज आढळले. सदर आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची कौैशल्यपुर्ण चौकशी केली असता सदर दस्ताऐवजांची भारतीय डाक विभागाकडून पडताळणी करुन घेतली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर आरोपी व त्यांच्या साथिदारांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींपैकी मुख्य आरोपी बाबाराव चर्हाण हा भारतीय डाक विभागात नांदेड येथे पोस्ट मास्तर पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करुन त्याला निलंबित केले होते. त्याला पोस्ट खात्याच्या कामकाजाची पुर्ण माहिती असल्याने त्याने व त्याचे साथीदारांनी बनावट दस्तोवज बनवून ती विविध पतसंस्था व बँकामध्ये गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेऊन पतसंथ्या व बँकाची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
- आरोपींनी विश्वास नागरी पतसंस्था, एचडीएफसी बँक माहीम व पनवेल, कुर्ला नागरी सहकारी बँक, सारस्वत बँक वाशी, पुसद सहकारी बँक पनवेल, येथे कर्जप्रकरणे केली आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya