14 कोटीचा विदेशी सिगरेटचा साठा जप्त
उरण : मुंबई डीआरआय विभागाने दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगरेटचा साठा शनिवारी न्हावा शेवा बंदरातून जप्त केला आहे. या सिगारेट अॅल्युमिनियम कचरा आणि वाहन इंजीनच्या स्पेअरपार्टमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. या सिगारेट साठ्याची किंमत 14 कोटी रुपयांच्या घरात आहे.
उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकार्यांना खबर्यांकडून मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरातून डीआरआय अधिकार्यांनी संशयित कंटेनर ताब्यात घेतला. कंटेनरची कसून तपासणी करताना कंटेनरमध्ये अॅल्युमिनियमचे भंगार आणि इंजीनच्या स्पेअरपार्टच्या नावाखाली आलेल्या सामानात लपवून ठेवलेल्या विदेशी सिगरेटचा साठा सापडला. सीमाशुल्क अधिनियम 162च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली. न्हावा शेवा बंदरात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत घडलेली ही तिसरी घटना आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya