अमली पदार्थ विक्री करणारी दुकली अटकेत
नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 85 हजार 500 रुपये किमतीची मेथॅक्युलॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. सीबीडी परिसरात हे दोघेजण आले असता, सापळा रचून कारवाई करण्यात आली. सीबीडी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी सहायक निरीक्षक नीलेश माने, हवालदार इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, राजेश गाढवे व योगीराम नाईक यांचे पथक तयार केले होते. त्यांनी गुरुवारी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयित ठिकाणी दोघेजण मोटरसायकलवर आले असता, त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे मेथॅक्युलॉन ही अमली पदार्थाची पावडर आढळून आली. बाजारभावानुसार त्याची किंमत 85 हजार 500 रुपये आहे.7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीया अमली पदार्थासह गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल व मोबाइल असा 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर दोघांनाही अटक करून त्यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही 7 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांनी हा पदार्थ कुठून आणला व कोणाला विकला जाणार होता, याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya