भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजयी
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजयी
मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने मोठं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं होतं. मुंबईच्या दहीसरमधील फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबात राजकीय फूट पडली. तेजस्वी घोसळकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे, दहीसर वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध शिवसेनेनं त्यांच्याच मैत्रिणीला मैदानात उतरवलं होतं. मात्र, दहीसरच्या जनेतनं तेजस्वी घोसाळकरांना स्वीकारत मोठ्या मतांनी विजयी केलंय.
भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर तेजस्वी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगे यांना 4115 मतं मिळाली होती. आता, दहीसरच्या वार्ड 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरगोस मतांनी विजयी झाल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांना 10755 मतांनी विजय मिळाला असून त्यांना एकूण 16,484 मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांनी 5729 मतं घेतली आहेत.
मुंबईच्या दहिसर विधानसभेतील प्रभाग 2 मध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. मात्र, ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम करणारा चेहरा, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे धनश्री कोलगे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर