नाशिकमध्ये भाजपला पुन्हा बहुमत, 72 जागांवर विजयी ...
नाशिकमध्ये भाजपला पुन्हा बहुमत, 72 जागांवर विजयी ...
नाशिक महापालिकेवर ‘शंभर प्लस’चा नारा देत मैदानात उतरलेल्या भाजपने अखेर 72 जागा जिंकत पुन्हा एकदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नाशिक महापालिकेवर ‘शंभर प्लस’चा नारा देत मैदानात उतरलेल्या भाजपने अखेर 72 जागा जिंकत पुन्हा एकदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मनपात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांचा टप्पा ओलांडत भाजपने कोणाच्याही पाठिंब्याविना सत्ता मिळवली असून, ही निवडणूक भाजपसाठी ताकद सिद्ध करणारी ठरली आहे.
भाजपला आव्हान देत महापौर पदाचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेला मात्र नाशिककरांनी अवघ्या 26 जागांवरच समाधान मानावे लागले. तर ठाकरे गटाने 15 जागा जिंकत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने सहा जागांची वाढ करत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
यंदा एकूण मतदानाची टक्केवारी 57 टक्क्यांवर स्थिरावली असून, 2017 मधील 62 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांची घट नोंदवली गेली. घटलेल्या मतदानाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी सभा घेत वातावरण निर्मिती केली, तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये मुक्काम ठोकून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी नाकारल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्यामुळे भाजपला फटका बसेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, सर्व विरोधी अंदाज फोल ठरवत भाजपने पूर्ण ताकदीनिशी लढत 72 जागांचा पल्ला गाठला.
नाशिक महानगरपालिकेचा निकाल
एकूण जागा : 122
भाजप - 72
शिंदेंची शिवसेना - 26
ठाकरेंची शिवसेना - 15
राष्ट्रवादी अजित पवार - 04
काँग्रेस - 03
मनसे - 01
अपक्ष - 01
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant