आशियाई पाणपक्षी गणनेत वाशीम–अकोला येथील पक्षी अभ्यासकांचा सहभाग
आशियाई पाणपक्षी गणनेत वाशीम–अकोला येथील पक्षी अभ्यासकांचा सहभाग
वाशिम - पश्चिम विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले, ‘पाणी देणार जंगल’ अशी ओळख असलेले काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभयारण्यात असलेला जलाशय देशी-विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. काटेपूर्णा जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण आशिया खंडात एकाच वेळी पाणपक्षी गणना करण्यात येत असून, काटेपूर्णा अभयारण्यातील जलाशयावरही पक्ष्यांची संख्या व प्रजातींची सविस्तर नोंद वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांमार्फत घेतली जात आहे. वाशीम येथील वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था आणि अकोला येथील निसर्ग कट्टा यांनी पुढाकार घेऊन ही पाणपक्षी गणना आयोजित केली आहे.
जैवविविधतेचा अभ्यास, स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांचा मागोवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती वाशीम-अकोला येथील पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व अमोल सावंत यांनी दिली. वाशीम जिल्हा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करणाऱ्या अनेक पक्ष्यांसाठी महत्त्वाचा थांबा ठरत असून, दरवर्षी जानेवारी महिन्यात विविध देशांतून येणारे विदेशी स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील जलाशय, नद्या व अभयारण्यांमध्ये मोठ्या संख्येने दाखल होतात. काटेपूर्णा अभयारण्यासह जिल्ह्यातील पाणवठे व हिरवळयुक्त परिसर हे या पक्ष्यांसाठी सुरक्षित विश्रांती व अन्नसंधानाचे केंद्र ठरत आहेत.
दरम्यान, काल झालेल्या पानपक्षी गणनेत करडा बगळा, सापमाने पाणपक्षी,
लहान पाणकावळा
काळ्या पंखांची टिटवी, जांभळा जलकोंबडा, रिव्हर टर्न, सामान्य पाणबदक, आशियाई चमचाबगळा
मोठा जाडघोट्या टिटवी, उत्तरी, शेपटाबदक, सुरखाब बदक आदी पाणपक्षांचे दर्शन झाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade