BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज
BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज
नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाने गट ‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1,121 रिक्त पदे भरली जाणार असून, देशभरातील पात्र उमेदवार 24 ऑगस्ट 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बीएसएफ भरती मंडळ लवकरच याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांनी BSF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होईल व अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे.
या भरतीमध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) पदासाठी 910 जागा आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदासाठी 211 जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल चारनुसार दरमहा 25,500 ते 81,100 हजार रुपये वेतन मिळणार आहे, जे 7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) असेल.
उपलब्ध पदे
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर):
उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुण असणे आवश्यक. अन्यथा, 10 वी उत्तीर्ण आणि रेडिओ व टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमधील ITI असणे आवश्यक.
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक):
12 वी उत्तीर्ण व वरील विषयांमध्ये 60% गुण आवश्यक किंवा 10 वी उत्तीर्ण आणि रेडिओ व टेलिव्हिजन, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिशियन, फिटर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स, कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्निशियन, मेकॅट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमधील ITI असणे आवश्यक.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya