Breaking News
BSNL चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन
मुंबई - BSNL ने खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एक अतिशय आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवा ₹1999 चा असून, या प्लॅनमुळे सतत रिचार्ज करावं लागणार नाही. वर्षभर सिम कार्ड अॅक्टीव्ह ठेवण्यासोबतच, दिवसाला दीड जीबीपेक्षा डेटा, अमर्याद कॉलिंग सुविधा अशा सगळ्या सुविधा या एका प्लॅनमुळे मिळणार आहेत. इतर खासगी कंपन्यांच्या वर्षभरासाठीच्या प्लॅनच्या तुलनेत हा प्लॅन अत्यंत किफायतशीर असल्याचा दावा BSNL ने केला आहे.
प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 600 GB डेटा मिळतो. या डेटासाठी रोजच्या वापराची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाहीये, म्हणजेच वर्षभरात हा डेटा कधीही वापरता येईल. 600 GB डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 kbps पर्यंत कमी करण्यात येईल.
या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विविध सबस्क्रिप्शनही देण्यात येणार आहेत. ग्राहकांना 365 दिवसांसाठी WOW Entertainment, Zing Music, BSNL Tunes आणि Hardy Games सारख्या सेवा निशुल्क मिळणार आहेत. त्यामुळे या प्लॅनमुळे केवळ डेटा आणि कॉलिंगची सेवा मिळणार असे नसून मनोरंजनासाठीच्या सबस्क्रिप्शन सेवाही मिळणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar