Breaking News
स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा
मुंबई, - हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीच्या औचित्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्य कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
डॉ. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इत्यादी बाबींतील विशेष कार्य विचारात घेऊन त्याअनुषंगाने शाश्वत शेती दिन राज्य / जिल्हा / तालुका स्तरावर साजरा करणे, विद्यापीठ स्तरावर साजरा करणे, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देणे, इत्यादी बाबींसंदर्भात कृषी आयुक्तलयाच्या वतीने शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
विद्यापीठांतर्गत स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर – संशोधन केंद्र.”
प्रत्येक कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान व अन्न सुरक्षा या संदर्भातील एक स्वंतत्र विषय निवडून विद्यापीठांतर्गत “डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर- संशोधन केंद्र” स्थापन करण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे