Breaking News
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे झाले नीरा स्नान…
सातारा -माऊली माऊलीच्या गजरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. निरा नदीच्या पात्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना पारंपारिक पद्धतीने स्नान घालण्यात आले, त्यानंतर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई ,नामदार मकरंद पाटील, नामदार जयकुमार गोरे , खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर,पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदी मान्यवरांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
लोणंद येथे संत ज्ञानेश्वर माऊलीचा एक दिवसाचा मुक्काम असून वारकऱ्यांसाठी सुरक्षित वारी, निर्मल वारी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आरोग्य आणि पाणीपुरवठा याबाबतची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या वतीने पालखी स्थळ आणि पालखी मार्गावर सुमारे दोन हजार पोलिस तैनात केलेले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar