Breaking News
निर्धार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने विधानसभा येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या मेळाव्याला सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. तसेच सर्व भायखळा विधानसभेतील प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्यक्ष शिवसेनेने घेतली पाहिजे असे आश्वासन या मेळाव्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांनी केले. या मेळाव्यामध्ये आमदार मनोज जामसूतकर यांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहा आम्ही तुमच्या सोबत सदैव असू कोणत्याही प्रकारे काम असेल तर म संकोचपणे आम्हाला सांगा आम्ही ते पूर्ण करू असे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेना सचिव सुरज चव्हाण, माजी नगरसेवक मंगेश बनसोड, रमाकांत रहाटे इतर मान्यवर मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे