Breaking News
श्री महालक्ष्मी मंदिर न्यासतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी आवाहन
मुंबई - शैक्षणिक वर्ष जून-२०२४ ते मे-२०२५ या कालावधीत इयत्ता ७ वी ते पदवीपर्यंत तसेच वैद्यकिय, इंजिनिअरींग आणि अभियांत्रीकी शाखेच्या पदविका-पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात ७०% किंवा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गरीब व होतकरू हिंदू विद्यार्थी-विद्यार्थीनींना श्री महालक्ष्मी मंदिर न्यास, भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी, मुंबई- ४०० ०२६ यांच्यातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विनामुल्य अर्जासाठी खालील कागदपत्रे घेऊन मंदिर कार्यालयात यावे. खालील कागदपत्रे न आणल्यास अर्ज दिला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच वैद्यकिय, इंजिनिअरींग आणि अभियांत्रीकी शाखेच्या पदवीका-पदवी उत्तीर्ण झालेल्या दोन्ही सत्रांच्या प्रती आणाव्यात.
१. वार्षिक परिक्षेच्या निकालाच्या गुणपत्रीकेची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत.
२. हिंदू असल्याचा पुरावा. (शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये हिंदू धर्म नमुद केलेला असेल असा अधिकृत दाखला)
३. शिधावाटप पत्रिकेची झेरॉक्स प्रत. (त्यावरील अनुक्रमांक सुस्पष्ट दिसला पाहिजे)
४. सध्याचा राहण्याचा पत्ता व शिधावाटप पत्रिकेवरील पत्ता एकच असणे आवश्यक आहे, बदल असल्यास योग्य स्पष्टीकरण दयावे.
५. पालकांच्या मासिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
६. स्वतःचा पत्ता असलेले पोस्टाचे पाकीट.
७. आई/वडील/पालक/विद्यार्थी यापैकी एकाचा रद्द केलेला धनादेश वरील कागदपत्रांसह जोडावा.
८. उपरोक्त शिष्यवृत्ती फक्त मुंबई/नवी मुंबई/ ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
उपरोक्त कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी कार्यालयात स्वतः येऊन मंदिराच्या बाजूला असलेल्या काऊंटरवरून अर्ज घेऊन जावे.
अधिक माहितीसाठी महालक्ष्मी मंदिराची वेबसाईट: www.mahalakshmi-temple.com पहावी असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar